ओला, उबर, रेपीडो कंपन्यांकडून अग्रीगेटर गाईडलाईनची पायमल्ली

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आक्रमक कारवाईची केली मागणी
Violation of Aggregator Guidelines by Ola Uber Rapido mumbai
Violation of Aggregator Guidelines by Ola Uber Rapido mumbaisakal

मुंबई : परराज्यातील नागरिक मुंबईत येऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे ॲप बेस्ड टॅक्सीचे परवाने मिळत आहे ओला, उबर आणि रेपीडो कंपन्यांकडून अशा चालकांचे पोलिस व्हेरिफिकेशन न करताच त्यांना बुकिंग दिल्या जात आह परिणामी महिलांचे विनयभंग, बलात्काराच्या घटना घडत आहे.

त्यामुळे ओला, उबर आणि रेपिडो कंपन्यांकडून दैनंदिन केंद्रीय मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन होत असल्याने अशा वाहनांवर कारवाईची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने लाऊन धरली आहे. महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडो या तिन्ही कंपन्यांकडून अॅग्रीगेटर गाईडलाईन 2020 नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेनेने केला असून,

यासंदर्भात १० मे २०२२ रोजी सुद्धा तत्कालीन परिवहन आयुक्तांना मनसेने मागणीचे पात्र दिले होते. दरम्यान आयुक्तांनी या विषयांवरील बैठकीमध्ये लवकरच अशा वाहनांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कारवाई होत नसल्याने मनसे वाहतूक सेना पुन्हा आक्रमक झाली आहे. परिणामी अशा अवैध ॲप बेस्ड कंपन्यांकडून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याने येत्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता सुध्दा मनसे चे अध्यक्ष संजय नाईक यांनी व्यक्त केली आहे.

त्याशिवाय ओला, उबर आणि अन्य अॅप बेस कंपन्यांकडून महाराष्ट्रात परराज्यातील वाहने टप्पा वाहतुक करत असल्याने स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा निर्माण झाली आहे. त्यासोबतच त्या वाहनाचे बहुतेक चालकांचा परवाना परराज्यातील असून त्यांचे वास्तव्य वाहनात असते शिवाय प्रातः विधी दिसेल त्या सुलभ शौचालयात केले जात असल्याने अशा नागरिकांकडून गैरकायदेशीर घटनांसाठी कारणीभूत ठरले जात असल्याने परिवहन विभागाने अशा वाहनावर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com