
Ulhasnagar Play Group Viral Video
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच शिक्षकांपासून मारहाण, गैरवर्तन असे कित्येक व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता उल्हासनगरमध्ये एका प्ले ग्रुपमधील शिक्षिकेने चिमुकल्या विद्यार्थ्याला शुल्लक कारणावरून मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.