Virar Building Collapse : मुंबईजवळील विरार येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताला ३० तासांहून अधिक वेळ लोटूनही बचावकार्य सुरूच आहे. एनडीआरएफच्या (NDRF) पाचव्या बटालियनच्या दोन तुकड्या, वसई-विरार महानगरपालिका आणि स्थानिक पोलिस रात्र-दिवस जीवाची पर्वा न करता ढिगाऱ्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी कार्यरत आहेत.