

Traffic Police Quick Action Prevents School Accident in Virar
Sakal
विरार : विरार पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर आज सकाळी एक गंभीर अपघात टळला. चंदनसार रोडकडून विरार पश्चिमकडे जाणाऱ्या एका खाजगी मॅजिक वाहनात अचानक बॅटरीचे शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. त्या वाहनात शालेय विद्यार्थी बसलेले असल्याने काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र, घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस पोलिस हवालदार कैलास कोकाटे आणि पोलिस शिपाई सुभाष जाधव यांनी वेळेत धाव घेत तत्परतेने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे मोठा अपघात टळला. वाहतूक पोलिसांच्या या सर्तकतेचे आणि धाडसाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे