esakal | विरार : ई-कचऱ्याची समस्या बिकट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

विरार : ई-कचऱ्याची समस्या बिकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विरार : वसई-विरार (Vasai-Virar) पालिकेत कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात असताना आता पालिका आणि ग्रामपंचायतीच्या सीमेवर असलेल्या आगाशीमध्ये वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल्सचा ई-कचरा मोठ्या प्रमाणात फेकला जात आहे. या कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. शिवाय, या ई कचऱ्याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो आहे.

नादुरुस्त टीव्ही संचाच्या काचा, वॉशिंग मशीनमध्ये वापरण्यात येणारे फोम तसेच इतर अनावश्यक असा प्लास्टिक कचरादेखील मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांकडून आगाशीजवळील तलावात टाकण्यात येतो आहे. तलावात घातक कचरा टाकल्यामुळे येथील कमल पुष्पांवरदेखील घातक परिणाम होत असून खाडीपात्रात फेकून दिलेल्या टीव्ही संचाच्या काचा पायाला लागून एक जणाला गंभीर दुखापतदेखील झाली आहे. आगाशी परिसरात जवळपास ५०० हून अधिक भंगार वाल्यांची वस्ती आहे. गेल्या काही वर्षांत या भंगारवाल्यांनी १२ ते १५ मोठी गोडाऊनही उभी केली आहेत.

हेही वाचा: नवी मुंबई : फळांची मागणी वाढली; दर स्थिर

आगाशी परिसर, उवर्गोठण, नवापूर, ज्योती, कोल्हापूर, चाळपेट, कोफराड, टेमो, पुरापाडा आदी परिसरातून हे भंगारविक्रेते अनावश्यक कचरा त्या परिसरात फेकून देतात. कचरा उचलण्यावरुन हद्दीचा वाद आगाशी ग्रामपंचायत व वसई-विरार पालिकेच्या क्षेत्रात भाटी बंदराचा काही भाग येतो. त्यामुळे येथे उघड्यावर | टाकून दिलेला ई-कचरा नक्की उचलायचा कोणी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

loading image
go to top