esakal | नियमांच्या चौकटीत गणरायाला निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नियमांच्या चौकटीत गणरायाला निरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडच्या (Covid) नियमावलीचे पालन करीत आज भक्तिभावाने दीड दिवसाच्या बाप्पाला (Bappa) निरोप देण्यात आला. मिरवणूक न काढता मोजक्या उपस्थितांसह आज संध्याकाळपर्यंत ५५ सार्वजनिक मंडळांसह ६१०२ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी कडेकोट पोलिस (Police) बंदोबस्तावरोबर पालिकेनेही (Municipal) कर्मचारी, कामगारांची अतिरिक्त कुमक तैनात केली आहे.

हेही वाचा: 'BMC' मध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती; फेरिवाल्यांवर होणार कारवाई ?

सलग दुसऱ्या वर्षी थाटामाटात होणारे विसर्जन टाळून साध्या पद्धतीने भक्तिमय वातावरणात विसर्जन झाले. त्यासाठी १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तसेच काही भागात फिरती विसर्जन स्थळेही सुरू केली दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज विविध कृत्रिम विसर्जन स्थळांना भेटी देऊन व्यवस्था आढावा घेतला.

loading image
go to top