Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाची जबाबदारी विवेक कुमार गुप्तावर; व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला!

भारतीय रेल्वेच्या अभियांत्रीकी सेवेतील विवेक कुमार गुप्ता यांच्या खाद्यावर देशातील बुलेट ट्रेन प्रकल्पाची जबाबदारी आली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून विवेक कुमार गुप्ता यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.
बुलेट ट्रेन प्रकल्पाची जबाबदारी विवेक कुमार गुप्तावर
बुलेट ट्रेन प्रकल्पाची जबाबदारी विवेक कुमार गुप्तावरsakal

Mumbai News : भारतीय रेल्वेच्या अभियांत्रीकी सेवेतील विवेक कुमार गुप्ता यांच्या खाद्यावर देशातील बुलेट ट्रेन प्रकल्पाची जबाबदारी आली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून विवेक कुमार गुप्ता यांनी सोमवारी पदभार स्वीकारला.

आयआरएसई १९८८ च्या बॅचचे अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांनी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदावर रुजू होण्यापूर्वी गुप्ता यांनी रेल्वे बोर्ड (रेल्वे मंत्रालय) येथे प्रधान कार्यकारी संचालक / गति-शक्ती म्हणून काम केले. याशिवाय विवेक कुमार गुप्ता यांनी यापुर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), मुख्य ट्रॅक अभियंता,

मुख्य पूल अभियंता आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अशी विविध वरिष्ठ पदांवर काम केले आहे. नवीन मार्गांचे बांधकाम, गेज रूपांतरण, दुहेरीकरण / मल्टी ट्रॅकिंग, रहदारी सुविधेची कामे, ट्रॅक बांधकामाची कामे आणि रेल्वे पुलांची देखभाल यासह बांधकाम प्रकल्पांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

एमआरव्हीसीमध्ये मुख्य अभियंता असताना एमयूटीपी I/एमयूटीपी-II आणि एमयूटीपी-III साठी प्रकल्प समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावली. एप्रिल २०१९ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान भुसावळ विभागाचे डिआरएम होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com