नेस्को कोव्हिड केंद्रात मंगळवारपासून नॉन कोव्हिड स्वयंसेवकांची आवाजाची चाचणी

भाग्यश्री भुवड
Saturday, 31 October 2020

गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रातून आवाजावरून कोरोना चाचणी प्रयोगासाठी कोरोना रुग्णांचे 1632 नमुने गोळा करण्यात आले आहेत.

मुंबई  : गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रातून आवाजावरून कोरोना चाचणी प्रयोगासाठी कोरोना रुग्णांचे 1632 नमुने गोळा करण्यात आले आहेत. मात्र, आता नॉन कोविड म्हणजेच ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या स्वयंसेवकांची आवाजाची आणि आरटीपीसीआर स्वाब चाचणी केली जाणार आहे.

 ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद

अश्या 100 नॉन कोविड स्वयंसेवकांची आरटीपीसीआर चाचणी आणि आवाजाची चाचणी केली जाणार असुन हा देखील एक अभ्यासाचा भाग असलयाचे नेस्को कोविड केंद्रांच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले आहे. 

येत्या मंगळवारपासुन ही चाचणी केली जाणार आहे. एकूण 100 जणांवर ही चाचणी केली जाणार असून सद्यपरिस्थितीत 42 स्वयंसेवकांची नोंदणी केली गेली. ज्यात कोविड केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांचा समावेश आहे. 

 

 

नॉन कोविड असणाऱ्या 100 स्वयंसेवकांची गरज - 

ज्यांनी या आधी कधीच चाचणी करुन घेतली नाही किंवा ज्यांना कोविडची ही लक्षणे नाहित, किंवा ज्यांना असे वाटते की ते कधीच कोणाच्या संपर्कात आले नाहित अश्या नॉन कोविड 100 स्वयंसेवकांची या अभ्यासासाठी गरज असुन कोणीही नेस्को मध्ये येऊन मोफत आरटीपीसीआर आणि आवाजाची चाचणी करुन घेऊ शकतात. 42 जणांची सध्या नोंद झाली आहे. कोविड रुग्ण आणि नॉन कोविड स्वयंसेवक यांच्या तुलनात्मक अभ्यासासाठी त्यांची गरज भासणार आहे असे ही डॉ. नीलम अंद्राडे यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण भारताचा अभ्यासाचा भाग म्हणून कोविड -19 च्या संशयित रूग्णांचे 1632 आवाजाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. जर निकाल योग्य आला तर एआय-आधारित आवाजाची चाचण्या रूग्णांच्या तपासणीसाठी वापरल्या जाण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे. हा अभ्यास शरीरातील श्वसन आणि संवाद प्रणालींमधील परस्पर संबंधाने संसर्ग व्यक्तींच्या आवाजावर परिणाम करू शकतो या अभ्यासावर आधारित आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर आधारित आहे. 

मुंबईतील भेंडीबाजारात फ्रान्स अध्यक्षांचे पोस्टर रस्त्यावर चिकटवून निषेध

तर नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, कोविड -19 रूग्णांना ओळखण्यासाठी व्हॉईस बायोमार्कर्सचा वापर पहिल्यांदयाच केला आहे. 1632 कोविड रुग्णांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. तर, आपल्याला 100 नॉन कोविड स्वयंसेवकांची गरज आहे. इस्त्राईल कंपनीने तशी विनंती केली होती की नॉन कोविड स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जावी. म्हणून अभ्यासाच्या अनुषंगाने आम्ही नॉन कोविड स्वयंसेवकांना शोधत आहोत.

Voice testing of non Covid volunteers from Tuesday at the Nesco Covid Center

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voice testing of non Covid volunteers from Tuesday at the Nesco Covid Center