esakal | नवी मुंबईत मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवी मुंबईत मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सानपाडा : नवी मुंबई (Navi Mumbai) पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने १ नोव्हेंबर पासून छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा: ऐरोली,कोपरखैरणे येथील पास केंद्र आजपासून सुरू

बेलापूर, ऐरोली, कळवा-मुंब्रा मतदारसंघातील याद्या निर्दोष राहण्यासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी राजकीय पक्षांनी प्रतिनिधी नेमावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोकण भवनमध्ये केले. एक जानेवारी २०२१ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवा मतदारांची नोंद नवीन मतदार यादीत होत नाही तसेच अनेक नवीन मतदारांचे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्यांची छाननी होते आणि एपिक नंबर देखील दिला जातो मात्र तरी देखील त्यांचे अर्ज नाकारण्यात येत असल्याचे नवी मुंबई काँग्रेसच्या वाशी ब्लॉकचे अध्यक्ष सचिन अरविंद नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

loading image
go to top