

BMC Election Voting Time
ESakal
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. मुंबईतील १ कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानाचा वेळ एक तासाने कमी केल्यामुळे, मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेत सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.