व्हेंटिलेटरवरील वाडिया हॉस्पिटलला टाळं लागू नये म्हणून..

व्हेंटिलेटरवरील वाडिया हॉस्पिटलला टाळं लागू नये म्हणून..

मुंबई - मुंबईतील वाडिया हॉस्पिटल. परळ लालबाग भागात राहणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि मध्यमवर्गीयांना सुविधा देणारं वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने हॉस्पिटलचं अनुदान थकवून ठेवण्याने या हॉस्पिटलमधील रुग्णांना त्याचसोबत इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय.

दरम्यान आता या रुग्णालय बंद होऊ नये म्हणून हॉस्पिटल कर्मचारी आणि  लाल बावटा जनरल कामगार युनियन यांनी वाडिया हॉस्पिटल बाहेर धरणं आंदोलन केलंय. डिसेंबर महिन्यापासून इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन थकलंय. याचसोबत जे कर्मचारी निवृत्त झालेत त्यांना देखील पेन्शन मिळत नसल्याचं या सर्व गोष्टींमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्वरित लक्ष घालून तोडगा पाहावा अशी मागणी केली जातेय.  

तीन प्रमुख मागण्या : 

वाडिया हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकारने वाडिया रुग्णालयाची ११० कोटींची अनुदान थकबाकी त्वरित द्यावी, वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी  जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा याचसोबत सहाव्या वेतन आयोगाची १० कोटी दहा लाखांची थकबाकी देखील त्वरित देण्यात यावी अशा मागण्या केल्या जातायत.

राजकीय प्रतिक्रिया :

या प्रकरणी आता राजकीय प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळतंय. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, सचिन सावंत, बाळा नांदगावकर, राजू वाघमारे, प्रकाश रेड्डी यांचं शिष्टमंडळ वाडिया हॉस्पिटल प्रशासनाच्या भेटीला गेलं होतं. "खासगी  हॉस्पिटल्स सामान्य रुग्णांना परवडणारी नाहीत, अशात वाडिया सारखी हॉस्पिटल्स टिकली पाहिजेत. महापालिका आयुक्त, राज्यसरकार मंत्री आणि आंदोलक यांच्यात बैठक घेऊन तोडगा काढावा", असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय. 

वाडिया हॉस्पिटल बंद होणं हे अत्यंत दुःखदायक चित्र आहे. अशा हॉस्पिटलची सध्या गरज आहे. गरिबांना या हॉस्पिटल्सची गरज आहे. आज अशा हॉस्पिटलची गरज असताना असे वाडिया बंद होत आहे. ही उलटी गंगा वाहत आहे. माझा जन्म देखील याच हॉस्पिटलमध्ये झाला. हे हॉस्पिटल राहिलं पाहिजे. इथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसोबत इथल्या कामगारांचा देखील प्रश्न मोठा आहे. गेल्या सरकार ने या हॉस्पिटलसाठी उपयोजना  करायला हव्या होत्या. महाविकास आघाडीचं सरकार या हॉस्पिटलसाठी नक्की काम करेल आणि अटी आणि शर्तीत अडकून न राहता लवकरात लवकर या हॉस्पिटल मदत होईल असं सचिन सावंत यांनी म्हंटलंय. 

वाडियाचे सीईओ म्हणतात : 

  • वाडिया हॉस्पिटल कुठल्याही परिस्थिती बंद होणार नाही.
  • हे खार आहे की हॉस्पिटलमधील औषधांचा साठा संपत चालला आहे.
  • ज्या रुग्णांवर औषध नसल्याने उपचार होऊ शकत नाही, अश्या रुग्णांना आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाही 
  • 300 हुन अधिक रुग्णांना आम्ही डिस्चार्ज दिले आहे
  • आमचे प्रशासनाशी बोलणे सुरू आहे. सर्वच अनुदान मिळाले तर रुग्णांना उपचार देणे शक्य होणार आहे.
  • महापालिका आणि राज्यशासनाचे प्रतिनिधी आमच्याकडे आहेत, म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही काही करू शकत नाहीत.
  • आमचं अनुदान थकलेले आहे, औषधाचा साठा नाही म्हणून आमच्याकडे नवीन  रुग्णभर्ती करण्यास आम्ही असमर्थ आहोत.
  • मुलांच्या रुग्णालयात दररोज 650 रुग्ण येतात तर प्रसूतिगृहात दररोज 300 रुग्ण येत असतात
  • अनुदान दिले जात नाही याची काही कारणे सांगितली जात आहेत. मात्र ती न्यायप्रविष्ट असल्याकारणाने यावर जास्त बोलता येत नाही.
  • रुग्णालय सुरू ठेवण्यासाठी तात्पुरत्या अनुदानाची गरज नाही. थकीत अनुदान एकदाच आणि कायमस्वरूपी द्यायला हवं 

उपमुख्यमंत्र्यांनी घेणार भेट 

दरम्यान वाडिया हॉस्पिटलच्या अनुदानासंदर्भात आता हे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेणार आहेत. इतर पक्षांना सोबत घेत अजित पवार यांची भेट घेऊ, असं देखील शर्मिला ठाकरे म्हणालात. 

wadi hospital staff starts agitation to save wadiya hospital


  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com