esakal | असनगाव स्थानक होम प्लॅटफॉर्मच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

असनगाव स्थानक होम प्लॅटफॉर्मच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेवर महत्त्वाचे आसनगाव स्थानक आहे; मात्र आसनगाव स्थानक अद्याप होम प्लॅटफॉर्मच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे कसारा या दिशेने ये-जा करणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यावर मर्यादा येत आहे.

त्यामुळे आसनगाव येथे होम प्लॅटफॉर्म म्हणून मंजूर करण्यासोबतच तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून केली जात आहे. शहापूर तालुक्यातील लोकसंख्या वाढत असल्याने आसनगाव स्थानकांवर प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येप्रमाणे लोकल फेऱ्या वाढविणे आवश्यक आहे.

हेही वाचा: PHOTOS: मुंबई-विजयवाडा महामार्गाच्या दर्जाहीन कामाचा सामान्यांना फटका

उत्तरेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गिकेवर भर दिला पाहिजे. तसेच लोकलच्या फेन्या वाढविण्यासाठी तातडीने आसनगावला होम प्लॅटफॉर्म सुरू करावा, अशी मागणी कल्याण असोसिएशनचे कोपाध्यक्ष दिनेश घरत यांनी केली.

loading image
go to top