मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री भागात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंदिरालगतची संरक्षक भिंत कोसळल्याने दगड आणि चिखलाचा ओघ थेट ऐतिहासिक सोमेश्वर मंदिरात घुसला असून, त्यामुळे भाविकांसाठी मंदिरात प्रवेश करणेही अशक्य झाले आहे.