esakal | कर्जतमध्ये 81 गाव-वाड्यात पाणी टंचाई; टॅंकरने पाणी पुरवठा
sakal

बोलून बातमी शोधा

tanker

कर्जत तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरच्या मदतीने पाणी वितरण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील 81 गावे-वाड्या टंचाईग्रस्त असून त्यातील 19 वाड्या आणि 6 गावांना टँकरच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे. 

कर्जतमध्ये 81 गाव-वाड्यात पाणी टंचाई; टॅंकरने पाणी पुरवठा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नेरळ : कर्जत तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरच्या मदतीने पाणी वितरण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील 81 गावे-वाड्या टंचाईग्रस्त असून त्यातील 19 वाड्या आणि 6 गावांना टँकरच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे. 

हे वाचा : 'त्या' व्हिडिओवरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपवर हल्लाबोल

दरम्यान, सरकारी टँकरची मागणी पुढे येत असून प्रामुख्याने माथेरानच्या डोंगरात वसलेल्या आदिवासी वाड्यांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. उन्हाळयात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात कर्जत तालुक्यातील 57 आदिवासी वाड्या आणि 24 गावांचा समावेश करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : अप्रतिम ! लॉकडाऊनमध्ये जोपासला अनोखा छंद, पक्षांच्या पिसांवर कोरलेली कलाकृती थक्क करणारी

पाणीटंचाई लक्षात घेऊन 1 मे पासून कर्जत पंचायत समितीने टँकर सुरू केले आहेत. सांगली येथून आलेल्या दोन टँकरच्या माध्यमातून आता तालुक्यातील 19 आदिवासी वाड्या आणि 6 गावांना टँकरने पाणी दिले जात आहे. टंचाईग्रस्त भागात टँकरचे पाणी पोहचविण्यासाठी पेज नदीवर वंजारवाडी पूल येथे पंप बसविण्यात आला आहे.     

नक्की वाचा : गुड न्यूज आली,  कोरोना संक्रमित मातांकडून 203 सुखरूप बाळांचा जन्म

पंपाच्या माध्यमातून तालुक्यातील मोरेवाडी, बांगरवाडी, धाबेवाडी, ताडवाडी, पेटारवाडी,वडाचीवाडी, टेपाचीवाडी, भागूचीवाडी एक आणि दोन, चिंचवाडी, गुडवणवाडी, चाफेवाडी, विठ्ठलवाडी, चौधरवाडी, बोरवाडी, भल्याचीवाडी आणि जांभूळवाडी येथे सध्या टँकरने पाणी पोहचवले जात आहे. तर तालुक्यातील किकवी, अँभेरपाडा, मोग्रज, गरुडपाडा, खानंद, मोहपाडा या सहा गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारी टँकर पाठवले जात आहेत.
आसल ग्रामपंचायत हद्दीतील संबंधित नऊ वाड्यांची नुकतीच गटविकास अधिकारी बालाजी पुरी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  पाहणी केली. तसेच तेथील ग्रामस्थांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या.

Water crisis in 81 villages in Karjat; Tanker water supply to 19 villages

loading image