अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Water Crisis: उल्हास नदीच्या पाण्यात सर्वाधिक गढूळपणा आढळून आल्याने अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 Ambernath and Badlapur Water Crisis

Ambernath and Badlapur Water Crisis

ESakal

Updated on: 

मोहिनी जाधव

बदलापूर : उल्हास नदीच्या पाण्यात गेल्या १० वर्षातील सर्वाधिक गढूळपणा आढळून आल्याने अंबरनाथ, बदलापूरच्या वितरणाचे संकट पुन्हा गडद झाले आहे. बदलापूर पश्चिमेकडील बरेज रोड येथील जलशुद्धीकरण केंद्रात केलेल्या तपासणीत नदीच्या पाण्याची गढूळता तब्बल ३७० एनटीयू (नेफलोमेट्रिक टर्विडिटी युनिट) वर पोहोचल्याचे आढळले. पावसाळ्यात साधारणपणे १५० ते २०० एनटीयू असणारे हे प्रमाण यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाणीउपसा आणि शुद्धीकरण प्रक्रियेवर मोठा ताण आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com