
Mumbai Pipeline Leakage
ESakal
मुंबई : मुंबई शहरात चर्चगेट येथील मंत्रालय इमारतीच्या समोर पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असून जल बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीसाठी पथके घटनास्थळी तैनात केली आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये गाड्या पाण्याखाली असलेल्या रस्त्यांवरून जाताना दिसत आहेत.