अंबरनाथ : पावसाळा सुरू होऊन महिना होत आला आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण ही ५० टक्के भरले. मात्र, अंबरनाथमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची समस्या अद्यापही असल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी एमजेपी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी १५ दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही, तर आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला.