Mumbai : पाणीसाठा घटला; मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात स्थिती गंभीर

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर
Mumbai
Mumbaiesakal

मुंबई : लोकसभा निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू असताना यंदाच्या निवडणुकीवर दुष्काळाचे गडद सावट जाणवू लागले आहे. निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी हा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही वेगाने कमी होत असून पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

Mumbai
Child Health : मुलांच्या आहारात 'या' 4 गोष्टींचा करा समावेश, हाडे होतील मजबूत...

आठवडाभरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या दोन बैठकांमध्ये निवडणूक नजरेसमोर ठेवून डझनावारी निर्णय घेण्यात आले, परंतु दुष्काळी परिस्थितीचा उल्लेखही झाला नाही. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये राज्यात फक्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मिळून १५ गावे आणि ४४ वाड्यांमध्ये १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. त्या तुलनेत यंदाची परिस्थिती भीषण असल्याचे आकडेवारीवरून दिसते. शासकीय आकडेवारीनुसार सध्या राज्यातील ७१८ गावे आणि १८८३ वाड्यांना ८८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Mumbai
Climatic Changes Affect Health : सर्दी-पडशाने सर्वसामान्यांचे हाल बेहाल; तापमानातील बदलाचा फटका, दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी

मराठवाड्यात २२.४८ टक्के साठा

लातूर जिल्ह्यात फक्त एका गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते, परंतु लातूरसारख्या शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा होत आहे. लातूरसह जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही पाणीप्रश्न गंभीर बनू शकतो. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात विहिरी कोरड्या पडू लागल्यामुळे शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे राहिल्याचे दिसून येते. मराठवाड्यातील सर्व प्रकारच्या एकूण ९२० प्रकल्पांमध्ये २२.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत तिथे ४७.९५ टक्के पाणीसाठा होता.

Mumbai
Working women health diseases: नोकरदार महिलांमध्ये आढळतात ‘हे’ सहा प्रकारचे आजार आणि गंभीर त्रास

टँकरची संख्या वाढवावी लागेल

पालघर जिल्ह्यातील सहा गावे आणि २७ वाड्यांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात १८४ गावे आणि ४०६ वाड्या, जळगावमधील २६ गावे तसेच नगर जिल्ह्यातील ३८ गावे आणि २१० वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्यात ३३ गावे आणि २४६ वाड्या, सांगली जिल्ह्यात ६८ गावे आणि ४८९ वाड्या, सोलापूर जिल्ह्यात सहा गावे आणि ५७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११९ गावे आणि २९ वाड्या, जालन्यातील १०३ गावे आणि ४० वाड्यांना टँकर सुरू झाले आहेत. बुलडाण्यातही दहा गावांना टँकर सुरू असून सरकारी आकडेवारीनुसार नागपूर आणि अमरावती विभागात अद्याप टँकरची गरज भासलेली नाही.

Mumbai
Child Health : वयाच्या सहाव्या वर्षानंतरही तुमचं मूल बोबडं बोलतं का? हे उपाय नक्की करा ट्राय

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. यापुढे दर आठवड्याला टँकरची संख्या वाढवावी लागेल आणि धरणांतील पाणीसाठाही कमी होत राहील. या परिस्थितीचा सामना करणे नागरिकांसह प्रशासनासाठीही आव्हानात्मक ठरणार आहे. निवडणुकीच्या कामातून प्रशासन पाणी टंचाईच्या परिस्थितीकडे किती आणि कसे लक्ष देते यावरही तीव्रता अवलंबून राहील.

Mumbai
Health Care News : ओठांवर वारंवार येतो घाम? काय असू शकतं कारण? जाणून घ्या उपाय

सांगलीत काँग्रेसचा मोर्चा

विभागात जिल्हानिहाय पाणी प्रश्नाचे स्वरूप गंभीर आहे. पाण्यावरून संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते, अशीही अनेक ठिकाणे आहेत. सांगली जिल्ह्यात आताच तशी परिस्थिती निर्माण झाली असून काँग्रेस पक्षाने दोन दिवसांपूर्वी पाण्यासाठी मोर्चा काढला होता. पाण्याचे राजकारण केले जाते आणि कोयना, वारणा धरणातील पाणी मिळण्यासाठी सांगलीला याचना करावी लागत असल्याचा आरोप मोर्चाद्वारे करण्यात आला. ऐन निवडणूक काळात असे प्रश्न हाताळणे प्रशासनासाठीही आव्हानात्मक बनणार आहे.

धरणांतील विभागवार पाणीसाठ्याची टक्केवारी (कंसात गेल्या वर्षीचे आकडे)

औरंगाबाद ः२२.४८ (४७.९५)

नागपूर ः५२.५२ (५३.९०)

अमरावती ः५४.२० (६५.९०)

नाशिक ः ४३.६० (५८.०७)

पुणेः४४.३७ (७७.६०)

कोकण ः ५५.९८ (५२.७५)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com