
खारघर : खारघरमधील कोयना प्रकल्पग्रस्त ओवे कॅम्प गावात भीषण पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त आहे. ऐन पावसाळयात पालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईमुळे महिलांना कपडे भांडी धुण्यासाठी गावा शेजारील ओढ्यात धाव घ्यावी लागत आहे. तसेच रस्त्याची दुरवस्था झाली असून गटारे दगड, मातीने भरून वाहत आहे. पालिका प्रशासनाने प्रकल्पग्रस्त गावातील समस्या दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.