मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशातच ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. मंगळवार (ता. २८) रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.