Water Supply : मुंबईकरांना 24 तास पाण्याची नव्या वर्षातही प्रतीक्षाच; लोकसंख्या आणि पाण्याची मागणी वाढली

मुंबईकरांना चोवीस तास पाणी देण्याची घोषणा पालिका प्रशासनाने केली आहे. मात्र नव्या वर्षात या योजनेची प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
Water Supply
Water Supplyesakal

मुंबई - मुंबईकरांना चोवीस तास पाणी देण्याची घोषणा पालिका प्रशासनाने केली आहे. मात्र नव्या वर्षात या योजनेची प्रतिक्षाच करावी लागणार आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे मुंबईत चोवीस तास पाण्याची योजना यशस्वी झाली नसल्याचे समजते.

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो.

मुंबईचा पाणीपुरवठा १४० किलोमीटर अंतरावर होतो. तर धरण क्षेत्र परिसरात राहणाऱ्यांनाही १६० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असून हे पाणी पिण्यासाठी व शेती कामासाठी वापरले जाते आणि सुमारे 800 दशलक्ष लिटर पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जात असल्याचे समजते.

मुंबईची वाढती लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईकरांच्या रोजच्या पाणी पुरवठ्याची मागणी वाढते आहे. त्यामुळे विविध आखलेलेल पाण्याचे प्रकल्प मार्गी लावून पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरु आहेत. मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. सत्ताधारी पक्षाकडूनही २४ तास पाण्याचे आश्वासन मुंबईला देण्यात आले होते.

सुरुवातीला मुलुंड व वांद्रे पश्चिम परिसरात २४ तास पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र मुंबईची भौगोलिक स्थिती लक्षात घेतल्यास संपूर्ण मुंबईला २४ तास पाणी पुरवठा करणे सध्या तरी अशक्य आहे. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात उंच टॉवर उभे राहत आहेत. तर दुसरीकडे दाटीवाटीने झोपड्याही उभ्या राहत आहेत.

त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असून उपलब्ध पाणीपुरवठा कमी पडत आहे. वाढीव पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित गारगाई, पिंजाळ व दमणगंगा यांसारखे नवीन जलस्रोत निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत पालिका जल अभियंता खात्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

नव्या जलस्त्रोतांची गरज

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईकरांसाठी सध्या किमान ५ हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईला प्रतिदिन ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्याने सध्या आणखी किमान १ हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबईला प्रस्तावित व अद्यापही रखडलेल्या गारगाई, दमणगंगा व पिंजाळ या नवीन जलस्तोत्राला चालना देणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या तास आठ महिने जलवाहिन्या फुटून मुंबईत कुठे ना कुठे पाणी कुठे पाणी कपात होत आहे. ज्या पाणी पुरवठ्याच्या योजनांचे नियोजन केले होते, ते प्रकल्प सुरूच झालेले नाहीत. फक्त 24 तास पाणी पुरवठ्याची घोषणा होत आहेत, योजना यशस्वी करण्यासाठी पाणी कुठे आहे. पालिकेचे नियोजन फसले आहे.

- रवी राजा, माजी विरोधी पक्ष नेते, मुंबई महानगर पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com