
मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत पावसाने मुंबईला झोडपून काढले असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने आज (१६ ऑगस्ट) मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडत आहे.