esakal | आम्ही मदत करू शकत नाही, तुम्हीच त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा; पनवेलच्या आयुक्तांचा धक्कादायक सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही मदत करू शकत नाही, तुम्हीच त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा; पनवेलच्या आयुक्तांचा धक्कादायक सल्ला
 
  • रुग्णवाहिकेअभावी क्वारंटाईन केलेल्या जवानाची हेळसांड  

आम्ही मदत करू शकत नाही, तुम्हीच त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा; पनवेलच्या आयुक्तांचा धक्कादायक सल्ला

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : पनवेल महानगरपालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा खारघर येथे राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या जीवावर उठला आहे. स्वप्नपूर्ती सोसायटीत राहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एक जवान कोरोनासदृश लक्षणांमुळे रविवारी रात्री उशिरा अत्यवस्थ झाला होता. या जवानाला मदत मिळावी म्हणून त्याची पत्नी आणि शेजाऱ्यांनी पनवेल पालिका आणि नवी मुंबई पोलिसांकडे मदत मागितली; परंतु त्या वेळी पालिका आणि पोलिस मदत पोहचवण्यात अपयशी ठरले. विशेष म्हणजे आता आम्ही मदत करू शकणार नाही. तुम्ही स्वतःच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा, असा चमत्कारिक सल्ला महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला. 

महत्वाची बातमी ः तुमच्या सोसायटीत ताजा भाजीपाला हवाय? मग वापरा हा फंडा! वाचा सविस्तर...

पनवेल महापालिकेतर्फे खारघर सेक्टर 36 मधील स्वप्नपूर्ती सोसायटीत राहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील तब्बल 250 जवानांना त्यांच्या कुटुंबांसह होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिलल्या आहेत; परंतु होम क्वारंटाईन केलेल्या सूचनांची नोटीस प्रत्यक्षात त्या जावानांना न देता इमारतीच्या तळमजल्यावर चिकटवली असल्याने जवानांना आपण क्वारंटाईन असल्याची कल्पनाच नाही. स्वप्नपूर्ती सोसायटीतील अत्यल्प उत्पन्न गटातील इमारतीमधील एका क्वारंटाईन केलेल्या जवानाला रविवारी रात्री उशिरा कोरोनासदृश लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली. जवानाच्या पत्नीने शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला. अशा परिस्थितीत शेजाऱ्यांनी सर्वात पहिले पालिकेच्या डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क झाला नाही.

महत्वाची बातमीलॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीयांची होतेय उपासमार! माय बाप सरकार देईल का लक्ष?

दुसरीकडे यामुळे संपूर्ण इमारत जागी झाली. तेव्हा पालिकेशी संपर्क होत नसल्याने शंभर नंबरवरून पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क केल्यावर काही मिनिटांच्या अंतराने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या दरम्यान विविध नागरिकांशी बोलून महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांचा दूरध्वनी क्रमांक शेजाऱ्यांनी मिळवला. देशमुख यांनी आपण मदत करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. तोपर्यंत आलेल्या पोलिसांकडे रहिवाशांनी अखेर रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी केली; परंतु आम्ही फक्त बंदोबस्त देऊ शकतो. आरोग्य सेवा देण्याचे काम महापालिकेचे आहे. सकाळी पाहू काय करायचे असे सांगून पोलिसांचे पथकही माघारी निघून गेले.

हेही वाचावाचाल तर थक्क व्हाल! वरळी प्रभादेवी परिसरात 37 जणांपासून 230 जणांना कोरोनाची बाधा

अखेर हतबल झालेले त्या इमारतीमधील शेजारी आणि रहिवासी रात्रभर जीव टांगणीला लावून आपापल्या घरात बसून राहिले, तर तो जवान रात्रभर श्वास विव्हळत राहिला. या सर्व प्रकारामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीत महापालिका आणि पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जर नागरिकांना क्वारंटाईन केल्यावर साध्या आरोग्याच्या सुविधा पनवेल महापालिका देत नसेल तर असले प्रशासन काय कामाचे, अशा संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उमटत आहेत. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा


काय बोलले आयुक्त?
महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना जवानाच्या शेजाऱ्याने फोन केल्यावर सर्व हकीगत ऐकत घेत देशमुख यांनी मदत करण्यासाठी आत्ता रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच तुम्हीच आता त्या अत्यवस्थ जवानाला कसेतरी करून डॉक्टरकडे घेऊन जा, असा अजब सल्ला दिला. मदतीऐवजी सल्ला दिल्याचे ऐकल्यावर शेजाऱ्यांनी देशमुख यांना शब्दांची लाखोळी वाहिली. तेव्हा तुम्ही एका आयुक्ताशी बोलत आहात, नशीब मी तरी तुमचा फोन उचलला, अशा शब्दांत देशमुख यांनी शेजाऱ्यांना जाणीव करून दिली. पुढे शेजारी काही बोलण्याआधीच देशमुख यांनी फोन कट केला. 

हे वाचलं का ः कोरोनाचा परिणाम : आजारी कैदी कारागृहातून थेट रस्त्यावर

आमच्या समोरच्या घरात राहणारे सीआयएसएफचे जवान अत्यवस्थ झाले होते. त्यांच्या पत्नीने घाबरून आमचे दार ठोठावल्यावर आम्ही मदतीसाठी धावलो. माझ्या पतीने रात्री आयुक्त गणेश देशमुख आणि पोलिसांकडे मदत मागितली; पण आम्हाला सहकार्य केले नाही. कोरोनामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात, पण अशा युद्धाच्या परिस्थितीत त्यांचेच सरकारी अधिकारी जनतेला मदत करत नसतील तर लोकांनी काय करायचे?
- कृष्णाली सावंत, स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवासी

स्वप्नपूर्ती सोसायटीत घडलेल्या घटनेबाबत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासोबत तातडीने बोलून योग्य त्या खबरदारीच्या सूचना घेण्याचे आदेश देतो.
- शिवाजी दौंड, विभागीय कोकण आयुक्त

loading image
go to top