esakal | मृतदेहांचा आकडा लपवण्यासाठी आमच्याकडे गंगा नाही - मुंबई महापौर
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar

मृतदेहांचा आकडा लपवण्यासाठी आमच्याकडे गंगा नाही - मुंबई महापौर

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : देशात कोरोनाच्या संकटकाळात आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरुच आहेत. भाजपने मुंबई महापालिकेवर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवल्याचा आरोप केला होता. यावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर पलटवार केला आहे. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशचं उदाहरणं देत आमच्याकडे मृतदेह लपवायला गंगा नदी नाही, असा टोला त्यांनी लगावला. (We do not have the Ganga river to release bodies into the water Mumbai mayor attack BJP)

हेही वाचा: 'मिशन पुणे': महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

माध्यमांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या, "आम्ही कधीही कोरोनानं मृत्यू झालेल्यांची संख्या कमी दाखवलेली नाही. मुंबईत आम्ही असं कधीच करणार नाही, कारण आमच्याकडे मृतदेह पाण्यात सोडून देण्यासाठी नदी नाही. आम्ही कुटुंबांचा सन्मान करतो त्यामुळे नियमानुसार मृत्यू दाखलाही देतो. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कानपूरपासून बिहारच्या बॉर्डरपर्यंत मृतदेह गंगा नदीत वाहून आलेले आढळून आले होते. यावरुन जगभरात मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

हेही वाचा: लसीचा दुसरा डोस चुकवणाऱ्या ५० ते ६० हजार जणांना BMC शोधणार

दरम्यान, मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वेगानं कमी झाली आहे. राज्यात बुधवारी १०,९८९ नवी प्रकरणं समोर आली होती. तर २६१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या २४ तासात १६,३७९ रुग्ण बरेही झाले. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.