
हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास कल्याण डोंबिवलीत वादळी वारा वाहू लागल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर काही क्षणातच कल्याण डोंबिवलीत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ पाहायला मिळाली आहे.