esakal | वेलडन मुंबई!! दिवाळी नंतर मुंबईत गेल्या 15 वर्षांच्या तुलनेत कमी प्रदूषण
sakal

बोलून बातमी शोधा

वेलडन मुंबई!! दिवाळी नंतर मुंबईत गेल्या 15 वर्षांच्या तुलनेत कमी प्रदूषण

वेलडन मुंबई!! दिवाळी नंतर मुंबईत गेल्या 15 वर्षांच्या तुलनेत कमी प्रदूषण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एकीकडे दिल्लीत प्रदूषणामुळे T20 सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता मुंबईमधून हवेतील प्रदुषणासंदर्भात बातमी येतेय. मुंबईकरांनो खरंच या वागणुकीबद्दल तुम्हा सर्वांचं कौतुक करावं लागेल. कारण, यंदा दिवाळीत मुंबईकरांनी एक चांगला चांगला विक्रम केलाय. मुंबईत दर दिवाळीत होणाऱ्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी यंदा खालावली आहे.

दिवाळीत प्रचंड आवाज आणि फटाक्यांच्या प्रदूषणामुळे अस्थमा किंवा दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आपण कायमच पाहतो आणि ऐकतो. अशातच यंदा मुंबईकरांनी कमी प्रमातात ध्वनीप्रदूषण आणि वायू प्रदूषण करत एक चांगला विक्रम प्रस्थापित केलाय.

आणखी बातम्या वाचा :: 

गुडविन ज्वेलर्सचा लोकांच्या पैशावर डल्ला ? PMC नंतर आता आणखी एक मोठा घोटाळा ?

'मोदीजी, हे मुस्लिम मला दिवाळी साजरी करू देत नाहीत'; अभिनेत्याचे ट्विट!

सणावारात दागिने पॉलीश करताय? 'या' टोळीबद्दल ऐकलं की नाही ?

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारींची भेट; सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेची धावपळ

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी वायू प्रदूषणाची चाचणी करण्यात येते. अशात यंदा मुंबईत हवेचा दर्जा हा चांगला होता आणि फटाक्यांच्या आवाजानी होणारं ध्वनी प्रदूषण देखील कमी होतं. आवाज संस्थेने ध्वनिप्रदूषणाची निरीक्षणं नोंदवली आहेत. यात यात मुंबईतील गेल्या पंधरा वर्षातील सर्वात कमी प्रदूषणाची नोंद झाली आहे.

WebTitle : well done mumbai air quality in mumbai after diwali remained good in last 15 years

loading image
go to top