Western Railway : पश्चिम रेल्वेच्या मोठा निर्णय! रद्द केलेल्या ११२ ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय

प्रवाशांची कोंडी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने बुधवार (ता.०१ ) रद्द करण्यात आलेल्या ३१६ लोकल फेऱ्यापैकी ११२ ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Western Railway
Western Railwayesakal

मुंबई - पश्चिम रेल्वेने खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या बांधकामांसाठी २९ दिवसांचा सुरु असेल्या मेगाब्लॉकमुळे सोमवारपासून ते शुक्रवारपर्यत दिवसाला ३१६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे पुरते हाल झाले आहे.

त्यामुळे प्रवाशांची कोंडी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने बुधवार (ता.०१ ) रद्द करण्यात आलेल्या ३१६ लोकल फेऱ्यापैकी ११२ ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांच्या ब्लॉक घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू केले आहे. हे काम खार ते गोरेगाव दरम्यान सुरु असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहे. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून ते शुक्रवारपर्यत दिवसाला ३१६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमावरी आणि मंगळावरी प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे.

मेगाब्लॉकच्या मनस्ताप सहन मुंबईकर लोकल लोकल गर्दीतून प्रवास करावा लागत आहेत. गेल्या दोन दिवस शंभरपेक्षा जास्त लोकल फेऱ्या विलंबाने धावत असल्याने आणि लोकल फेऱ्या रद्द असल्याने प्रवाशांना खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करावा लागला. गेल्या चार दिवसांत तब्बल १०५८ लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेने रद्द केल्या असून मंगळवारी देखील ३१६ पैकी २३३ लोकल सेवा रद्द करण्यात आल्या.

वाढती गर्दी पाहत ८३ लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले. तसेच प्रवाशांना लोकल गर्दीची भेडसावणारी समस्या कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने रद्द केलेल्या ३१६ लोकल फेऱ्यापैकी बुधवार १ नोव्हेंबरपासून ११२ ट्रेन पूर्ववत केल्या जातील, म्हणजे फक्त २०४ लोकल फेऱ्या अधिसूचित प्रमाणे रद्द करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे, २ नोव्हेंबरला ११२ गाड्या पूर्ववत केल्या जाणार आहे, त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे.

पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ३५ लाखांहून अधिक प्रवास करतात. मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा रद्द केल्यामुळे पश्चिम रेल्वे स्थानकांवरील प्रचंड गर्दी उसळी होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू नयेत म्हणून पश्चिम रेल्वेने अनेक महत्त्वपूर्ण स्थानकात लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ जवानांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

पश्चिम रेल्वे स्थानकावरील लॅटफॉर्म, पदाची पुलावरील गर्दी नियंत्रणासाठी ५३७ जवांचा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. मात्र तसेच आता १ नोव्हेंबरपासून आणखी २३८ एमएसएफ जवान तैनात करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com