

Mumbai Western Railway Co-Working Space
ESakal
मुंबई : प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि भाडे-व्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक नवीन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर देशातील पहिले स्टेशन-आधारित को-वर्किंग स्पेस सुरू करण्यात आले आहे. या अत्याधुनिक डिजिटल लाउंज आणि को-वर्किंग सुविधेचा उद्देश प्रवाशांना त्यांच्या ट्रेनची वाट पाहत असताना आरामदायी आणि व्यावसायिक वातावरणात काम करण्याचा पर्याय प्रदान करणे आहे.