
"Two coaches of Amritsar Express detached near Dahanu station, affecting local commuter train services."
Sakal
-सुमित पाटील
बोईसर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्स्प्रेससोबत ही घटना घडली. वांद्रे ते अमृतसर जाणाऱ्या रेल्वेमध्ये रविवार (तारीख २८) सप्टेंबर रोजी दुपारी १.२० वाजताच्या सुमारास डब्यांच्या जोडणीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही अडचण वाणगाव आणि डहाणू स्थानकांदरम्यान घडली असून यामुळे गाडीचे डबे काही काळासाठी वेगळे झाले होते. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते.