पश्चिम रेल्वेच्या लोकलचा पुन्हा खोळंबा

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते विरार स्थानकात दरम्यान आज (ता.०७) सकाळी ५.४७ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला.
Western Railway
Western Railwaysakal
Summary

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते विरार स्थानकात दरम्यान आज (ता.०७) सकाळी ५.४७ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला.

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते विरार स्थानकात दरम्यान आज (ता.०७) सकाळी ५.४७ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकल वाहतुक विस्कळित झाली. या बिघाडामुळे लोकल फेऱ्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे चागले हाल झाले आहे.

सोमवारी सकाळी ५.४७ वाजता वैतरणा ते विरार दरम्यान अप जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे अप जलद मार्गवरील लोकलचे तीनतेरा वाजले. यामुळे अप जलद मार्गावरील लोकल गाड्या सिग्नल बिघाडामुळे जागीच खोळंबल्या. परिणामी लोकलच्या रांगा लागल्या. लोकलच्या खोळंबामुळे भर सकाळी प्रवाशांचे हाल झाले आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनंतर सिग्नल यंत्रणा पुर्ववत करण्यात आले .त्यानंतर अप जलद मार्गावरील लोकल सुरु झाल्या, परंतु तोपर्यत गाड्यांचे बंचिग झाले होते. लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. या सिग्नल बिघाडामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे आणि लांब पल्ल्याच्या गाड्या २० मिनिटांनी उशिराने धावत होत्या. परिणामी सकाळच्या वेळेत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

सततच्या सिग्नल बिघाडामुळे प्रवासी हैराण

गेल्या तीन दिवसापूर्वी पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे अप-डाउन जलद मार्गावरील लोकल वाहतुक विस्कळित झाली होती. सोमवारी पुन्हा एकदा वैतरणा ते विरार स्थानकात दरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलचा खोळंबा झाला आहे. सततच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवासी हैराण झाले आहे. पश्चिम रेल्वे दर रविवारी मेगा ब्लॉक घेते मात्र तरीसुद्धा सिग्नल यंत्रणेत स्वीकार होत असल्याने प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com