

Western Railway local train service disrupted
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांचे सकाळपासून हाल होत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवार (ता. ४) रोजी लोकल ट्रेन जवळपास तासभर उशिरा सुरु असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तसेच ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेट मार्क लागत असल्याचे समोर आले आहे.