

Western Railway Local Train Delay
ESakal
मुंबई : मुंबईकरांची लोकलवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलसेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ४० ते ४५ मिनिटं उशिराने सुरु आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या विलंबाने धावत असून कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचे हाल होत असल्याची माहिती समोर आली आहे.