Mumbai Local: पावसाचा हाहाकार! सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे विस्कळीत, लोकल अर्धा तास उशिराने

Western Railway: मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. लोकल अर्धा तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
Western Railway Service Delay

Western Railway Service Delay

ESakal

Updated on

पालघर : जिल्ह्यात रविवारी (ता. ५) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले असून, संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला. वसई-विरार यादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा काही काळ विस्कळीत झाली. अनेक लोकल गाड्या उशिराने धावल्या, तर हजारो प्रवासीवर्गाचा स्थानकांवर खोळंबा झाला. दिवसभर मुसळधार पाऊस असाच सुरू राहिला, तर सूर्या, वैतरणा, पिंजाळ आणि देहरजे या नद्या धोका पातळीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com