Mumbai: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! २,६५७ प्रवाशांवर कारवाईचा बडगा, ५ लाखांची वसुली

Western Railway Action: मुंबई रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांवर पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिलमध्ये २,६५७ प्रवाशांवर कारवाई केली असून दंडातून ५.३७ लाखांची वसुली प्रशासनाने केली आहे.
Western Railway action on spitting on station

Western Railway action on spitting on station

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. स्थानक परिसरात थुंकणे आणि कचरा टाकण्याच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः पान, गुटखा आणि तंबाखू खाऊन प्लॅटफॉर्म, जिने, रेल्वे पूल आणि रेल्वे रुळांच्या परिसरात थुंकणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com