दोन वर्षात 40 कोटी, पश्चिम रेल्वेची एसी लोकल सुसाट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

95 लाख 81 हजार प्रवाशांनी केला प्रवास 

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित (एसी) लोकलला दोन वर्ष पूर्ण झाले असून या लोकलला  प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  मागील दोन वर्षात या लोकलमधून 95 लाख 81 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून पश्चिम रेल्वेला 40 कोटी 3 लाख रुपयांची वाढ झाली आहे, असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

25 डिसेंबर 2017 रोजी पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल धावली. या एसी लोकलला यंदा दोन वर्षे पूर्ण झाली. पहिल्या दिवसापासून एसी लोकल प्रवाशांच्या पसंतीस पडली. त्यानंतर 25 डिसेंबर 2017 ते 15 डिसेंबर 2019 या कालावधीत 95 लाख 81 हजार प्रवाशांनी प्रवास केला. 

मोठी बातमी : ठाणे मनपाच्या निशाण्यावर Axis Bank; पगारखातं बदललं.. 

12 डब्यांच्या एसी लोकलच्या दिवसातून 12 फेऱ्या होतात. सहा लोकल फेऱ्या चर्चगेट दिशेकडे तर, सहा लोकल फेऱ्या विरार दिशेकडे  धावतात. मात्र ही सेवा सुरूवातीला शनिवार, रविवार वगळता मिळत होती. मात्र 14 सप्टेंबर 2019 पासून दुसरी एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आल्याने प्रवाशांना संपूर्ण आठवडा थंडगार प्रवास मिळत आहे.

  • एका फेरीत सुमारे 1 हजार 500 प्रवासी क्षमता 
  • दिवसाला सुमारे 18 हजार प्रवासी प्रवास करतात. 
  • 1 हजार 28 आसन व्यवस्था
  • 4 हजार 936 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता  

मोठी बातमी :  स्वतःच जेट विमान असणाऱ्या माधुरीने विकला 'तो' बंगला

एसी लोकलमध्ये सुरक्षा यंत्रणा आहे. ऑटोमॅटीक दरवाजे, आरामदायक आसन व्यवस्था, प्रत्येक बोगीत अग्निशमन यंत्रणा, जीपीएस सुविधा, प्रवासी संवाद, एलइडी वीज  सुविधा, 100 किमी प्रति तास गती. 

WebTitle : western railways earned forty crore from ac train


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: western railways earned forty crore from ac train