Sunburn Festival
ESakal
मुंबई
Sunburn Festival: मुंबईत पहिल्यांदाच होणारा सनबर्न फेस्टिव्हल नेमका काय? तो रद्द करण्याची मागणी का होतेय? जाणून घ्या यामागचा वाद
Sunburn Festival: भारतातील सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल १९-२१ डिसेंबर रोजी मुंबईत सुरू होत आहे. सनबर्न आयोजकांना हा महोत्सव गोव्याच्या मूळ ठिकाणावरून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील शिवडी येथे हलवावा लागला आहे.
मुंबईत पहिल्यांदाच सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम १९ ते २१ डिसेंबर दरम्यान होणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDM) कार्यक्रमांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमावरून मुंबईत वाद सुरू आहे. विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. लोक सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करत आहेत.

