रिक्षाच्या चाकांसह जगण्याचा गाडाही थांबवला, रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाची कोंडी

autorickshaw
autorickshaw

वाशी : नवी मुंबईमधील गवतेवाडी परिसरात दहा-बाय-दहाच्या खोलीत सचिन मिडगुले हे तीन मुली, एक मुलगा आणि पत्नीसह राहतात. त्यांचा हा कुटुंब रिक्षाच्या कमाईतून चालतो. मात्र, दीड महिन्यापासून रिक्षा चालवणे बंद झाल्याने जगण्याचा गाडाही थांबला आहे. हीच परिस्थिती अन्य रिक्षाचालकांची होऊन बसली आहे.

नवी मुंबईत 18 हजार नोंदणीकृत रिक्षा असून, त्यावर  25 हजार चालकांचे पोट आहे. कुटुंबीयांचाच विचार केला तर 75 हजार ते एक लाखाच्या आसपास रिक्षाच्या कमाईवर जगणारे आहेत. याशिवाय रिक्षा दुरुस्तीचा उद्योगही ऑटोवर अवलंबून असून, गॅरेज आणि तंत्रज्ञ मिळून सव्वा लाख नागरिकांचा चरितार्थ ऑटो चालवण्याच्या व्यवसायावरच अवलंबून आहे. 
काहींनी रिक्षा विकत घेतली असून व्यवसाय ठप्प झाल्यामुळे हप्ते भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हप्त्यासाठी बँका, पतसंस्था काही काळ सूट देतीलही. परंतु, आता कुटुंबाला जगवण्याचा प्रश्न पडला असून, जे भाड्याने ऑटो चालवतात, त्यांची पोटा-पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

आता जवळपास दीड महिना होत आला. घरात बसून आहे. कमाईचा एक छदामही नाही. पत्नी काही घरांमध्ये काम करायची. मात्र, तिच्याही हाताला काम नाही. घरात तीन मुलींसह एक लहान मुलगा आहे. आम्ही दोघे नवरा-बायको, अशी सहा तोंडे खाणारी आहेत. प्रत्येक दिवस कठीण जात आहे. कशातच मन लागत नाही. चिंतेने हृदयाचे ठोके वाढत जातात. 
- सचिन मिडगुले, रिक्षाचालक

The wheels of the rickshaws stopped, life became difficult!
18,000 rickshaw pullers in Navi Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com