"माझ्यापासून काही लपवत नाहीस ना.. " शरद पवार यांचा जितेंद्र आव्हाडांना फोन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

आव्हाड यांना होम क्वॉरन्टाईन केल्याची बातमी कळताच खुद्द राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करुन चौकशी केली आहे. याबद्दलची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: आपल्या फेसबुकवरुन दिली आहे.

मुंबई :  जितेंद्र, माझ्यापासून काही लपवत नाहीस ना, अशी विचारणा शरद पवार यांनी केल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरन्टाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात ठाणे येथील पत्रकार, कॅमेरामन देखील आल्याने त्यांनादेखील क्वॉरन्टाईन होण्यास सांगितले आहे.

आव्हाड यांना होम क्वॉरन्टाईन केल्याची बातमी कळताच खुद्द राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करुन चौकशी केली आहे. याबद्दलची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: आपल्या फेसबुकवरुन दिली आहे.

मोठी बातमी - डिटेल नियमावली जाहीर; २० एप्रिलपासून काय सुरु, काय बंद... वाचा

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

अचानक साहेबांचा फोन आला. आवाजामध्ये एक माया, आपलेपणा, काळजी हे सगळं दिसत होत. जितेंद्र कसा आहेस. मी म्हटल साहेब सगळं ठिक आहे. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. मी म्हटल नाही साहेब. सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि आता थोडासा घरी राहून लढाई लढ. मग म्हंटलं साहेब 80 हजार खिचडी वाटपाच काय करायच. त्यावरती ते काहीच बोलले नाहीत. अस्वस्थ
गरीबाबद्दल त्यांची तळमळ आम्ही ओळखुन आहोत. पण, साहेब तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. आतातर ही महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे, पण शरणागती घेता येणार नाही.
तुमचेच संस्कार. 
लोकांसाठी लढायचे
एक फोन आणि जादू झाली
आशीर्वाद असावेत!

Big News : 20 तारखेनंतर कंपन्या सुरु करायच्यात, मग 'हे' नियम पाळा... 
 

अशा आशयाची भावनिक पोस्ट आव्हाडांनी शेअर केली आहे.

when sharad pawar calls NCP leader jeetendra awhad read full conversation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when sharad pawar calls NCP leader jeetendra awhad read full conversation