Mumbai Water Supply: मॉन्सून कोकणातच खोळंबला! मुंबईवर पाणीटंचाईचे संकट, पाऊस कधी बरसणार? मोठी अपडेट समोर

Mumbai Weather Update: अनेक आठवड्यांच्या तीव्र दमटपणा, वाढते तापमान आणि पावसाच्या लक्षणीय कमतरतेनंतर भारतीय हवामान विभागाने २२ जूनपासून मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Mumbai Water crisis

Mumbai Water crisis

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कोकणातून मान्सून पुढे सरकण्यात अपयश आल्यामुळे, २३ जून रोजी मुंबईत दाखल होणारा मान्सून आता दोन ते तीन दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे. स्कायमेटचे प्रमुख महेश पलावत यांच्या मते, मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे तो कोकणातच थांबला आहे. बंगालच्या उपसागरातील काही घडामोडींमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात बदल अपेक्षित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com