esakal | महापालिकेत 810 लिपिक पदे भरणार
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

नोकरभरतीच्या निर्णयाची पालिकेत अंमलबजावणी

महापालिकेत 810 लिपिक पदे भरणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नव्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच बेरोजगारीच्या गंभीर प्रश्‍नावर तोडगा म्हणून नोकरभरतीची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणीदेखील पालिकेत सुरू झाली आहे. त्यानुसार महापालिका 810 लिपिक पदांच्या भरतीची प्रक्रियादेखील सुरू करणार आहे. आर्थिक संकट दूर होईपर्यंत भरती स्थगित ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयालाही स्थायी समितीने फेटाळून लावले आहे.

मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत... 

मुंबई महापालिकेत 810 लिपिक (कार्यकारी सहायक) पदांसाठी भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता; मात्र महापालिका आर्थिक संकटात असल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत भरती करू नये, असे निवेदन स्थायी समितीत प्रशासनाने दिले होते. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तसे स्पष्टदेखील केले होते.

मुंबई यंदाही तुंबणार

प्रशासनाच्या या भूमिकेनंतर महापालिकेत याचे पडसाद उमटले; मात्र भरती न करण्याच्या निर्णयावर ठाम राहून लिपिक पदासाठीच्या भरतीचा प्रस्ताव मागे घेण्यासाठी प्रशासनाने स्थायी समितीत निवेदन केले होते. प्रशासनाने दोन वेळा हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवला होता. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. भरती थांबवू नये, ती व्हायला पाहिजे, अशी जोरदार मागणीही केली. 

अनधिकृत नर्सिंग होमवर विधीमंडळात लक्षवेधी

महापालिकेत सल्लागार आणि ओएसडींची खोगीरभरती करून जर नोकरभरती थांबवली जाणार असेल तर ते खपवून घेणार नाही, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला ठणकावत भरतीचा प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मंजूर केला. या निर्णयामुळे स्थायी समितीने अधिकाराचा वापर करीत प्रशासनाच्या निर्णयावर मात केली आहे.

त्या फिलीपाईन्सच्या नागरिकाला कोरोना नाही

नोकरभरतीची प्रक्रिया प्रशासनाने राबवण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश समिती अध्यक्षांनी दिले आहेत. त्यामुळे लिपिक पदाच्या भरतीचा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने नुकतेच कामगार भरतीचे धोरण अवलंबले आहे. लवकरच नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. 

810 clerical posts Will fill in the BMC

loading image
go to top