
मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश गेल्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे मजूर, विद्यार्थी आणि कामानिमित्त इतर राज्यांमध्ये गेलेले लोकं तिथेच अडकून पडले आहेत. मात्र त्यांची घरी जाण्याची खटपट सतत सुरु आहे. त्यामुळे मजूर आणि त्यांचं कुटुंब शेकडो किलोमीटर पायी प्रवास करत आहेत. मात्र असाच पायी प्रवास करताना एका महिलेनं बाळा जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये आपल्या राज्यात आपल्या घरी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे हाताला काम नसलेल्या कित्येक मजुरांनीमुंबईहून शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत आपल्या थेट आपलं गाठण्याचा निर्णय घेतला. काहींनी तसं केलंही. मॅत्रर हे करताना आहि मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र यात एक मन सुन्न करणारी आणि या मजुरांची परिस्थिती किती वाईट आहे यावर प्रकाश टाकणारी घटना घडली आहे.
३० वर्षांची एक महिला मजूर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातल्या आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघाली होती. मात्र रस्त्यात प्रसवकळा सुरू झाल्यामुळे तिला पुढे एकही पाऊल टाकता येत नव्हतं. दुर्दैव म्हणजे जवळपास एकही रुग्णालय नव्हतं. अशावेळी त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला मात्रा त्यांनी अखेर धाडसी पाऊल उचललं. नाशिकच्या ३० किलोमीटर पायी चालत होते. त्यांच्यासोबत अनेक कुटुंब होते. त्यात शकुंतला नावाच्या महिलेला प्रसवकळा सुरु झाल्या. मात्र जवळपास रुग्णालय दिसत नव्हतं. त्यामुळे सोबत असलेल्या महिलांनी रस्त्याच्या कोपऱ्यात साडीच्या आडोशात महिलेची प्रसूती केली. यात शकुंतलानं एका मुलीला जन्म दिला. मात्र यानंतर जे घडलं ते मन हेलावून टाकणारं होतं.
प्रस्तुतीच्या वेदना सहन केल्यानंतर विश्रांती न घेता या आईनं तिच्या नवजात बाळाला घेऊन भर उन्हात एक नाही दोन नाही तर तब्बल १६० किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण केला. राज्य सीमावर तपास करणाऱ्या पोलिसांनी जेव्हा महिलेच्या हातात तान्ह बाळं पाहिलं तेव्हा त्यांची विचारपूस केल. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी शकुंतला तिचा पती आणि नवजात बाळासह पाचही जणांना एकलव्य छात्रावासमध्ये पोहोचवलं. तिथे त्यांच्या रंगण्याची आणि खाण्याची सोय करण्यात आली. त्यांनतर त्यांना घरी पोहोचवण्यासाठी बसही सोडण्यात आली.
While walking to the village she gave birth to a baby
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.