esakal | कुणाच्या गळ्यात पडणार शिवसेनेच्या गटनेता पदाची माळ ?
sakal

बोलून बातमी शोधा

कुणाच्या गळ्यात पडणार शिवसेनेच्या गटनेता पदाची माळ ?
  • शिवसेना आमदारांच्या बैठकीला सुरूवात.
  • शिवसेना भवनात शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक..
  • बैठकीत शिवसेनेचा गटनेता ठरण्याची शक्यता...
  • आदित्यच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? 

कुणाच्या गळ्यात पडणार शिवसेनेच्या गटनेता पदाची माळ ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवसेना भवनावर आज शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झालीय. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या गटनेतेपदी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची वर्णी लागतेय का?, याची उत्सुकता लागली आहे. आदित्य यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती विधानसभेत पोहोचली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना गटनेता बनविण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत.

बाळासाहेबांनी आम्हाला शब्द पाळायला शिकवलं, पण... : संजय राऊत

फ्लेमिंगो दर्शनासाठी १५ नोव्हेंबरपासून बोट सेवा सुरू

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर आदित्य यांना विधिमंडळ नेतेपद दिलं जाणार नसल्याचं बोललं जातंय. आदित्य ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक असल्याचंही बोललं जातंय. 
 

राज्यातील सत्तेचा तिढा कायम : 

राज्यातील सत्तेचा तिढा अद्याप सुटत नाहीत. सत्तेचा समसमान वाटा मिळावा यासाठी शिवसेना ठाम आहे. असं असतानाच आता घटक पक्षांनीही चार मंत्रीपद मिळावीत अशी मागणी केलीय. घटकपक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर रामदास आठवले यांनी ही मागणी केलीय. घटकपक्ष मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असा विश्वासही आठवलेनी व्यक्त केलाय.

WebTitle : who will become legislative party leader of shivsena