लढत विधानसभा अध्यक्षपदाची; कोण आहेत पटोले? कोण कथोरे?

लढत विधानसभा अध्यक्षपदाची; कोण आहेत पटोले? कोण कथोरे?

मुंबई : कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले आणि भाजपच्या किसन कथोरे यांच्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी लढत होतेय. उद्या सभागृहात अध्यक्षपदासाठी मतदान पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून किसन कथोरे यांच्या नावाची घोषणा केलीय तर, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून नाना पटोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उद्या विधानसभेत याबद्दलची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

कोण आहेत नाना पटोले? 

नाना पटोले हे साकोली मतदार संघातून निवडून आलेत. यापूर्वी नाना पटोळे हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार राहिलेत. 2014 ते 2017 मध्ये पटोले भाजपचे खासदार होते. 2017 मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. यानंतर नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विधानसभेवर निवडून आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते आक्रमक आहेत. पण, आक्रमकता योग्य ठिकाणी वापरू, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी उमेदवारीच्या घोषणेनंतर दिली आहे. 

कोण आहेत किसन कथोरे?

भाजपचे किसन कथोरे हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला तब्बल एक लाख 36 हजार मतांनी पराभूत केलंय. कथोरे हे 2004 मध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. यानंतर त्यांनी मुरबाड मतदार संघातून सलग तीन वेळा विजय मिळवला आहे. 2009 मध्ये देखील त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. 2014 मध्ये पक्षांतर करत कथोरे यांनी भाजपची वाट धरली आणि भाजपकडून निवडूक लढवत विजय मिळवला.

गेल्या शुक्रवारी कालिदास कोळंबकर यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. यानंतर आज विधानसभेत बहुमत चाचणीत महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. आता उद्या कथोरे आणि पटोले यांच्यामध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी सामना रंगताना पाहायला मिळणार आहे.  

Webtitle : who will become speaker of vidhansabha nana patole or kisan kathore

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com