esakal | बहुमत चाचणीत उद्धव ठाकरे पास; काय आणि कसे घडले? वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

बहुमत चाचणीत उद्धव ठाकरे पास; काय आणि कसे घडले? वाचा एका क्लिकवर

- उद्धव ठाकरे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव अखेर जिंकला

बहुमत चाचणीत उद्धव ठाकरे पास; काय आणि कसे घडले? वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : विधिमंडळात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 169 विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सकाळपासून या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी झाल्या. विधानसभेत आणि सभागृहाबाहेर आरोप-प्रत्यारोप झाले. सभागृहात भाजप सदस्यांच्या अनुस्थितीत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पाहा काय-काय घडले? कसे घडले?

 • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतली फडणवीस यांच्या जवळच्या नेत्याची भेट 
 • अजित पवार-प्रताप चिखलीकर यांच्या भेटीने चर्चेला उधाण
 • भेट राजकीय नाही, अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण
 • राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस आणि शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी 
 • चंद्रकांत पाटील यांच्याकडून पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवरच घेतला आक्षेप
 •  विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून किसन कथोरे यांच्या नावाची घोषणा
 • शपथविधीला आक्षेप घेत, राज्यपालांकडे तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा इशारा 
 • शपथविधीला घेतलेल्या आक्षेपानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फेटाळले आरोप
 • श्रद्धास्थानाला आक्षेप घेतला तर संपूर्ण संसद रिकामी होईल : नवाब मलिक
 • काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव जाहीर. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा
 • दुपारी दोन वाजता बहुमत चाचणीसाठी सभागृहाचे कामकाज सुरू
 • कामकाज सुरू होताच, भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक, विधिमंडळाचे अधिवेशनच अवैध असल्याचा आरोप
 • शपथविधीमध्ये श्रद्धा स्थानांची नावे घेतली, नियमांना धरून शपथ घेतली नाही : फडणवीसांचा आरोप 
 • विधिमंडळाचे हंगामी अध्यक्ष का बदलले?; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला सवाल
 • विधिमंडळाचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांचे आक्षेप फेटाळून लावले.
 • विधिमंडळाचे अध्यक्ष बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे; दिलीप वळसे-पाटील यांची सभागृहाला माहिती
 • राज्यपालांच्या आदेशानुसारच अधिवेशन, दिलीप वळसे-पाटील यांचे स्पष्टीकरण 
 • सरकारच्या कामकाजावर बहिष्कार टाकत, फडणवीस यांच्यासह भाजप सदस्यांचा सभात्याग
 • हंगामी अध्यक्ष वळसे-पाटील यांच्याकडून बहुमत चाचणीच्या कामकाजाला सुरवात 
 • उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 169 मते, तर भाजपच्या सभात्यागामुळे विरोधात शून्य मते
 • मनसेचा एक, एमआयएमचे दोन आणि माकपचा एक आमदार तटस्थ
 • उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 विरुद्ध 0 मतांनी जिंकला
 • सत्तेच्या गणितात उद्धव ठाकरे पास, देवेंद्र फडणवीस नापास

आणखी वाचा :  

बहुमत चाचणीनंतर अमित शहा आता महाराष्ट्रात!

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री; 169 आमदारांच्या पाठिंब्यांने बहुमत सिद्ध

विधिमंडळात गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी भाजप सदस्यांचा सभात्याग