

South Mumbai Auto Ban Why Police Blocked Autos at Chunabhatti and Sion Explained
Esakal
मुंबईत दादरला चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचा मोठा जनसागर लोटला आहे. दरम्यान, दादरच्या दिशेनं निघालेल्या काही अनुयायांना पोलिसांनी चुनाभट्टी, सायन परिसरात अडवल्यानं गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी अडवल्यानं भीम अनुयायांनी रस्त्यातच ठिय्या मांडला. दक्षिण मुंबईत रिक्षांना परवानगी नसल्यानं त्यांना अडवण्यात आलंय. तर दरवर्षी रिक्षाने येतो पण यंदाच अडवलं असल्याचा आरोप अनुयायांनी केलाय.