

Ritu Tawade Selection Reasons
ESakal
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवीन महापौर मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाने घाटकोपरच्या तीन वेळा नगरसेवक असलेल्या रितू तावडे यांना मुंबईच्या ७८ व्या महापौरपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. महायुती आघाडीत झालेल्या करारानुसार, महापौरपद भाजपकडे गेले आहे. तर उपमहापौरपद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे गेले आहे. संजय घाडी यांना उमेदवारी दिली आहे. अशातच आता महापौर म्हणून तावडेंची निवड का केली? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यांच्या निवडीमागील कारणे समोर आली आहेत.