Lalbaugcha Raja Visarjan
ESakal
मुंबई
Lalbaugcha Raja ची विसर्जन मिरवणूक हिंदुस्तानी मशीदीजवळ का थांबते? इतिहास जाणून घ्या
Ganesh Visarjan: गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन होत असून हिंदुस्तानी मशिदीजवळ येताच काही वेळ थांबण्याची परंपरा आहे. राजाची मिरवणूक मशिदीजवळ येताच थांबली जाते, याबाबत जाणून घ्या.
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. दरम्यान आज गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस असून उद्या म्हणजेच शनिवार (ता. ६) रोजी गणरायाचे विसर्जन होणार आहे. यामध्ये मुंबईतील नवसाला पावणारा लालबागच्या राजाचे विसर्जन भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. २४ ते २५ तास चालणारं लालबागच्या राजाचं विसर्जन चालू राहत असून राजाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते.