अमेरिकेच्या महावाणिज्य दूत कार्यालयामार्फत 'असा' होणार मराठीचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

मराठी राजभाषा दिनी अमेरिकी महावाणिज्यदूत कार्यालयाचा उपक्रम 

मुंबई : मराठी राजभाषा दिनानिमित्त येत्या गुरुवारी (ता. 27) येथील अमेरिकेच्या महावाणिज्य दूत कार्यालयामार्फत मराठीच्या सन्मानार्थ आगळावेगळा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. भारतासारख्या देशाला भेडसावणाऱ्या आजारांची संपूर्ण माहिती मराठीतून मिळावी यासाठी विकिपिडियाच्या सहकार्याने विकिपिडिया स्वास्थ्य हे मराठी पोर्टल यावेळी सुरु केले जाईल. 

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; 'इतके' शेतकरी ठरलेत लाभार्थी...

मराठी भाषा दिनानिमित्ताने अमेरिकी महावाणिज्यदूत कार्यालयाने असा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच सुरु केला आहे. मागील मराठी भाषादिनी त्यांनी काही मराठी व्हिडियो प्रसारित केले होते. विकिपिडियाने देखील भारतात पहिल्यांदा या उपक्रमाद्वारे मराठीला हा बहुमान दिला आहे. यानंतर विकिपिडिया स्वास्थ्य हे पोर्टल हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, तमिळ आदी दहा भारतीय भाषांमध्ये सुरु केले जाणार आहे. यात आरोग्यविषयक माहिती, आजार तसेच रुग्णालये, डॉक्‍टर संघटना आदींची माहिती असेल. 

गुरुवारी वांद्रे कुर्ला संकुलातील अमेरिकी महावाणिज्यदूत कार्यालयात यानिमित्त होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास आरोग्यक्षेत्रातचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार तसेच अनुभवी वैद्यक अधिकारी उपस्थित राहतील. या विषयावर त्यांचे एक चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. विकिपिडिया स्वास्थ्य पोर्टलवर माहिती समाविष्ट करण्याची कार्यपद्धतीदेखील यावेळी दाखविली जाईल. 

35 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा

हा उपक्रम लोकांना आपला वाटावा व त्यात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळून विकिपिडिया वरील तपशील सुधारला जावा हा या मराठी उपक्रमामागील हेतू आहे. संवादातून सुधारणा व्हावी यासाठी परिसंवादात चर्चा केली जाईल. सुरुवातीला या पोर्टलमध्ये भारतीय उपखंडात आढळणाऱ्या आजारांची माहिती दिली जाईल, नंतर त्याची व्याप्ती वाढविली जाईल. यात प्रथम टीबी, गर्भवती-बाळंतीण यांची काळजी, कुष्ठरोग, टीबी, साथीचे रोग, ऋतूबदलामुळे होणारे विशिष्ठ आजार आदींची माहिती येईल. रोगाची लक्षणे, उपचार यासंदर्भात तपशीलात सुधारणा करण्याची संधीही वापरकर्त्यांना मिळेल. त्यायोगे तपशीलात सुधारणा होऊन अचूकता यावी हा हेतू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wikipedia Health - Information about illnesses in Marathi