वसई-विरार पालिकेची शेवटची महासभा होणार? नगरसेवकांच्या मनात शंका

vasai virar.
vasai virar.

विरार : वसई-विरार महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल 28 जूनला संपत असून त्यानंतर प्रशासकीय कारभार सुरू होणार आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेची महासभा रखडली असून कार्यकाल संपण्यापूर्वी तरी ती होणार का, असा प्रश्‍न आता नगरसेवकच विचारत आहेत. दुसऱ्या बाजूला नवीन आयुक्त आणि प्रशासन यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार होणार असून तो टाळण्यासाठी प्रशासन महासभा घेण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप नगरसेवकांकडून होऊ लागला आहे. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा 16 मार्चला झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच सभांना बंदी होती, परंतु आता काही निर्बंध शिथिल झाले असूनही सोशल डिस्टन्सिंग पाळून सभा घेण्यास मंजुरी असतानाही आणि नगरसेवक मागणी करत असतानाही प्रशासन मात्र सभा घेण्याचे लांबणीवर टाकत असल्याने चर्चेला उधान आले आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवे आयुक्त डी. गंगाधरण यांनी आपल्या अधिकारावर अतिक्रमण करून आतापासूनच प्रशासकाप्रमाणे वागणूक सुरू केल्याचा आरोपही होत आहे. त्यांच्या कृतीचा निषेधही सभेत होण्याची श्‍यक्‍यता असल्याने सभा टाळण्याचे प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. 

प्रशासनाकडे सातत्याने महासभा घेण्याची मागणी आम्ही करत आहोत. घटनादुरुस्तीनुसार सर्व ते सोपस्कार पाळून सभा घेण्याचे काम प्रशासनाचे असताना ते होत नसल्याचे दिसत आहे. सभा न घेताच नवे पालिका आयुक्त विविध कामांना प्रशासक म्हणून मान्यता देणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकते. 
- उमेश नाईक, ज्येष्ठ नगरसेवक, बहुजन विकास आघाडी 

महासभेसाठी जागेची पाहणी? 
महासभा घेण्यासाठी हालचाली सुरू असून सोशल डिस्टन्सिंग पाळून महिनाअखेर देवतलाव येथील भंडारी हॉलमध्ये ती घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी पाहणी केल्याचे समजते, परंतु त्याबाबत प्रशासनातर्फे अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हेरवाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही तसेच मेसेजलाही उत्तर दिले नाही.

Will the last general meeting of Vasai-Virar Corporation be held? Doubts in the minds of corporators

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com