Lockdown : आधी दुकानं बंद, आता सुरु केली तर पोलिसांची दमदाटी; वाईनशॉप मालक हैराण

wine shop
wine shop

नवी मुंबई : मद्याच्या दुकानांतून दूरध्वनीवरून घरपोच मद्यविक्री करण्यास सीमाशुल्क विभागाने वाईनशॉप मालकांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे गेले दोन महिने बंद असलेली नवी मुंबईतील मद्याची दुकाने उघडण्यात आली; मात्र दुकाने उघडी ठेवण्यावरून नवी मुंबई पोलिसांकडून या दुकानदारांना धमकावले जात आहे. तसेच काहीही कारणे देऊन दंडात्मक रक्कम उकळली जात असल्याने विक्रेते हवालदील झाले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी लागू असल्यामुळे मद्याची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सरकारने राज्यात मद्याच्या दुकानांना सुरू करण्यास परवानगी दिली तरीही नवी मुंबई शहर रेडझोनमध्ये येत असल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सरकारने सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी दारू घरपोच देण्याची परवानगी दिल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तसे परिपत्रक काढून शनिवारपासून नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी दारू विक्रीला पुन्हा सुरूवात झाली; मात्र दारू विक्री करताना दुकानदारांना दुकानाचे शटर उघडावे लागत आहे. उघडलेले शटर बघून पोलीस कर्मचारी तूटून पडत आहेत.

विविध कायद्यांचा धाक दाखवून कशा प्रकारे दुकानमालकावर दबाव निर्माण होईल हे पाहीले जात आहे. दूकान उघडल्यापासून आधी बीट मार्शल, नंतर स्थानिक पोलीस कॉन्स्टेबल यांचे देणे झाले की मग स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभाग असे वेगवेगळे पोलीस दलातील लोक येऊन दारूच्या दुकानमालकांना नियम वाचून दाखवत आहेत. सीमाशुल्क खात्याने दिलेल्या नियमानुसार दारू विक्री करण्यासाठी शटर उघडले तरीही पोलीस दम देऊन शटर बंद करायला भाग पाडत असल्याचे एका सिवूड्समधील दूकानदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सरकारला महसूल मिळावा म्हणून सरकारने दारुच्या दुकानांना होम डिलीव्हरी देण्यासाठी परवानगी दिली आहे. 

मद्यपींचा हिरमोड
पामबीच रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या एका दारूच्या दूकान मालकाला शुक्रवारी नेरूळ पोलिसांनी नियमांचा पाढा वाचून ५५ हजार रूपयांचा दंड आकारला आहे. त्यानंतर सिवूड्स आणि नेरूळ भागात सुरू केलेल्या काही दुकानदारांनाही पोलिसांनी दमदाटी करून पोलीस ठाण्यात बोलवून घेतले होते. परंतू नियमाने दारू विक्री करणाऱ्या दुकानमालकांनाही पोलीसच आडकाठी आणत असतील तर दारू विक्री करण्याऐवजी दूकाने बंद करून ठेवण्यात काही दूकान मालकांनी धन्यता मानली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील मद्यपींचा हिरमोड झाला आहे. याबाबत विचारणा केली असता अधिक माहिती घेऊन चौकशी करू असे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

Wine shop owner's head fever Even after the permission of the customs department

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com